International Yoga Day : पंतप्रधान मोदी यांनी केला संयुक्त राष्ट्रांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा, पहा व्हिडिओ - Yoga Day Celebrations In New York
🎬 Watch Now: Feature Video
न्यूयॉर्क: आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. देशभरात विविध ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर आहेत, ते संयुक्त राष्ट्रांमध्ये योग दिन साजरा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात पोहोचले आहेत. यूएन मुख्यालयात 180 देशांच्या प्रतिनिधींसोबत पंतप्रधान मोदी योग करत आहेत. आज आंतरराष्ट्रीय योग दिवस विविध ठिकाणी साजरा केला जात आहे. दरवर्षी योग दिनासाठी वेगळी थीम ठेवली जाते. वसुधैव कुटुंबकम या तत्त्वावर या वर्षी योग दिनाची थीम 'एक जग, एक आरोग्य' अशी आहे. आयुष मंत्रालयाने ही थीम निवडली आहे. या कार्यक्रमात संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो गुतरेस आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या विविध देशातील राजदूत तसेच नेते सहभागी झाले आहेत.