महाराष्ट्र दौऱ्यावर पंतप्रधान मोदी; काळाराम मंदिरात टाळ वाजवून केलं भजन - पंतप्रधान मोदी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 12, 2024, 2:28 PM IST

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील काळाराम मंदिरात जाऊन पूजा केली. तेथून रोड शो करत ते पंचवटी येथील राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या ठिकाणी पोहोचतील. भगवान राम आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासोबत पंचवटीत काही वर्षे वास्तव्य करत होते. महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये रोड शो करत आहेत. २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन आणि भाषणासाठी नाशिकमध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रभू श्रीराम 14 वर्षांसाठी वनवासात गेले तेव्हा ते नाशिकच्या पंचवटीत राहिले. अयोध्येतील रामलल्ला अभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या नाशिक दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. काळाराम मंदिरात पंतप्रधान मोदींनी टाळ वाजवून भजन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध रेल्वे प्रकल्पांचा शुभारंभ करणार आहेत. सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन-स्पेशल इकॉनॉमिक झोन (SEEPZ SEZ) या ठिकाणी जेम्स आणि ज्वेलरी क्षेत्रासाठी 'भारतरत्न' (मेगा कॉमन फॅसिलिटेशन सेंटर) चे उद्घाटन करणार आहेत. या सेंटरमध्ये जगातील सर्वोत्तम मशिन्स उपलब्ध असणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.