तेलंगणात लोकांची स्वप्ने पूर्ण होत नाहीत, आम्ही युवकांच्या मागण्या अंमलात आणू -प्रियांका गांधी - युवा संघर्ष मेळाव्यात प्रियंका गांधी
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद : तेलंगणात ज्या आशा आणि स्वप्नांसह तेलंगणाची निर्मिती झाली त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. मात्र, आम्ही त्या पुर्ण करण्यासाठी कटीबद्ध आहोत असे आश्वासन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी तेलंगणातील जनतेला दिले आहे. त्या आज सोमवार येथे झालेल्या काँग्रेसच्या 'युवा संघर्ष' मेळाव्यात बोलत होत्या. 'आम्ही तेलंगणातील युवकांचे ऐकणार आहोत. त्यांचे जे मत आहे ते आम्ही आमलात आणू असही त्या म्हणाल्या आहेत. प्रियंका यांनी तेलंगणा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरूर नगरमध्ये आयोजित 'युवा संघर्ष' सभेला संबोधित केले. काँग्रेस नेत्या आणि एआयसीसीच्या राष्ट्रीय सचिव प्रियांका गांधी यांचे कार्यकर्त्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. प्रियंका गांधी यांनी आपले स्वागत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आणि उन्हाळ्यातही मोठ्या संख्येने लोक सभेला आले होते त्याबद्दलही त्यांनी विशेष आभार मानले. दरम्यान, प्रियंका यांनी जय तेलंगणा बोलत भाषण सुरू केले.