Baramati Crime जेवणाच्या ताटावरून उठलेल्या डॉक्टरला कुटुंबीयांसह मारहाण; पाच जणांविरोधात गुन्हा - माळेगाव पोलीस ठाणे
🎬 Watch Now: Feature Video
Baramati Crime बारामती पेशंटला तपासणीसाठी घरातून लवकर बाहेर न आल्यावरून डॉक्टर सह कुटुंबीयांना रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना बारामती Baramati Crime तालुक्यातील सांगवी येथे घडली. याप्रकरणी युवराज शिवाजी गायकवाड, डॉक्टर रा. सांगवी, ता बारामती यांनी फिर्याद दिली आहे. Beating Doctor family In Sanagvi आनंदा संभाजी जगताप, विश्वजीत आनंदा जगताप, भूषण आनंदा जगताप, राजेंद्र शंकर जगताप, अशोक शंकर जगताप, सर्व राहणार सांगवी ता. बारामती अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत. सदर घटनेची हकीकत अशी की, फिर्यादी डॉक्टर यांचा दवाखाना व घर बारामती तालुक्यातील सांगवी येथे आहे. डॉक्टर युवराज गायकवाड हे ओपीडी संपवून रात्री 9:30 वाजता घरात जेवण करत होते. दरम्यान डॉक्टर रुग्णाला तपासणीसाठी लवकर येत नसल्याने वरील आरोपींनी बेकायदेशीर जमाव करून डॉक्टरांच्या घरी जात घराचा दरवाजा वाजवून खिडकीची काच फोडून घरात प्रवेश केला. सदर प्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात Malegaon Police Station वरील आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास पोलीस हवालदार संजय मोहिते करत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST