Osmanabad Crime News : वारकरी शिक्षण संस्थेत मुलाला केले आत्महत्येस प्रवृत्त; पालकांनी केली तानाजी सावंत यांच्याकडे तक्रार - ढोकी पोलीस
🎬 Watch Now: Feature Video
उस्मानाबाद : वाणेवाडी गावातील श्री संत नारायण बाबा रामजी अध्यात्मीक वारकरी शिक्षण संस्थेत १५ वर्षीय मुलाचा ५ ऑगस्ट रोजी मृत्यु झाला होता. या प्रकरणात आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे. तर अन्य तिघे संशयित फरार आहेत. या तिघांनाही तात्काळ अटक करण्याची मागणी, मयत मुलाच्या पालकांनी आज पालकमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केली आहे. सदर मृत्यु संशयास्पद असून ही आत्महत्या असल्याचे सांगितले जात आहे. मुलाचे वडील लहू शिंदे यांनी सांगितले की, संस्थाचालक व शिक्षक, मुलांना शेतातील कामे लावत होते. तसेच काम न केल्यास मारहाण करत होते. मयत मुलाच्या अंगावर वळ असल्याने ही आत्महत्या नसून घातपात असल्याचे बोलले जात आहे. तर याप्रकरणी शवविच्छेदन अहवालाप्रमाणे ५ व्यक्तींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत दोघांना अटक झाली आहे. इतर तिघे फरार झाले आहेत. दरम्यान आज मयताच्या पालकांनी ढोकी पोलीस आरोपींना पाठीशी घालत असल्याची तक्रार, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केली आहे.