Budget session 2023: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक पुन्हा आक्रमक; विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत सरकारचा निषेध - Mumbai news
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याचा आज शेवटचा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर पुन्हा विरोधक आक्रमक झालेले आहेत. शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी, यासाठी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यापासून वारंवार शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. आजही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणा करत विरोधक विधानभवनाच्या पायऱ्यांवर एकजुटले. या अगोदर देखील विविध मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले आहेत. आज देखील त्यांनी घोषणाबाजी केली आहे. संपूर्ण देशात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून वातावरण गंभीर असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी विरोधी पक्षाने सरकारचा निषेध केल्याचे दिसून येत आहे.