OBC March Nagpur: मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास ओबीसी संघटनांचा विरोध, नागपुरात निघाला महामोर्चा - मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 18, 2023, 6:13 PM IST
नागपूर (OBC March Nagpur): मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला अजिबात धक्का लागू देणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देत असले तरी विदर्भातील ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे. मराठा समाजाला कोट्यातून आरक्षण देण्यात येईल अशी शक्यता वाटत असल्याने कुणबीसह ओबीसीच्या शेकडो संघटनांकडून सर्वपक्षीय महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, सुनील केदार, भाजप नेते आशिष देशमुख, राकॉं नेते अनिल देशमुख, कॉंग्रेस नेते नितीन राऊत यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले. मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ नका, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आलीय. गेल्या आठ दिवसांपासून नागपूरच्या संविधान चौक येथे सर्वशाखीय कुणबी समाज आणि ओबीसी समाजाचे आंदोलन सुरू आहे. मध्यंतरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आंदोलकांची नागपुरात भेट घेतली होती. उपोषण मागे घेण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात येईल अशी शक्यता असताना आज ओबीसी संघटनेतर्फे महामोर्चा काढण्यात आला. यामध्ये मोठ्या संख्येनं महिला आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.