Andheri By Election result अंधेरी पोटनिवडणुकीतील विजयानंतर काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे, पाहा... - Andheri By Election result
🎬 Watch Now: Feature Video
राज्यात काही दिवसांपासून राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीचा निकाल ( Andheri East by election result ) आज जाहीर झाला. या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके 58875 इतक्या मतांनी विजयी झाल्या आहेत. तर नोटाला 11569 इतकी मत मिळाली आहेत. यावर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलंय की, मला खूप आनंद झाला आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. शिवसेनेला यश मिळाले की त्यात प्रखरता नाही. तसेच ज्यांची पोटदुखी होत आहे ते अनेक कारणे समोर आणत आहे. ज्यांनी मतदान केल आहे त्यांचे मी आभार मानते. तसेच ज्यांनी माघार घेतली त्यांचे देखील आभार मानते. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाजवळ त्यांच्या स्मूर्तीसाठी एक ज्योत कायम आहे आणि या निवडणुकीसाठी देखील आम्हाला मशाल चिन्ह मिळाली. आणि आत्ता निवडणूक आयोग जे काही निर्णय देईल ते योग्यच आहे. असे यावेळी निलम गोऱ्हे म्हणाले. यावेळी आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद याने शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे यांच्याशी खास बातचीत केली आहे.पाहूयात...
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST