महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे भोंगा आंदोलन - भोंगा आंदोलन
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - इंधन दरवाढीविरोधात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भोंगा आंदोलन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जुनी भाषणे भोंग्यावर लावण्यात आली होती. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले की, सध्या देशामध्ये धार्मिकतेचे मोठे राजकारण केले जात आहे. यामध्ये मुख्यत्वे भोंग्याचा राजकारण सध्या तापले आहे. देशाला विकासाची गरज आहे आणि केंद्र सरकारकडून इंधन दरावर नियंत्रण नसल्याने इंधन दरासह महागाई वाढत आहे. बेरोजगारी वाढत आहे. भोंग्याला भोंग्याने उत्तर म्हणून भोंगा आंदोलन छेडण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST