मुंबई : केजीएफ स्टार यशचा आगामी चित्रपट 'टॉक्सिक' प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. 8 जानेवारी रोजी यशच्या वाढदिवशी, निर्मात्यांनी चित्रपटातील यशाचा फर्स्ट लूकसह टीझर रिलीज केला होता. यानंतर त्यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. 'टॉक्सिक' चित्रपटातील यशचा हा नवा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. या चित्रपटाचा टीझर 24 तासांत लोकांनी खूप पाहिला आहे. आता अल्लू अर्जुन अभिनीत 'पुष्पा 2: द रुल' चित्रपटाला देखील या चित्रपटानं मागे टाकून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही अनेक विक्रम प्रस्थापित करेल अशी अपेक्षा आहे.
'टॉक्सिक'चा टीझर धमाकेदार : 'टॉक्सिक'च्या टीझरनं 13 तासांत 5 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आता या चित्रपटानं 'पुष्पा 2'च्या व्ह्यूजला मागे टाकले आहे. चित्रपट उद्योगातील ट्रॅकर मनोबाला विजयनबलन यांनी त्यांच्या ऑफिशियल एक्सवर 'टॉक्सिक'बद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, 'यश अभिनीत 'टॉक्सिक'नं अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2'ला मागे टाकत पहिल्या 24 तासांत सर्वाधिक पाहिला गेलेला भारतीय ग्लिम्प्स बनला आहे.' केव्हीएन प्रॉडक्शनच्या यूट्यूब चॅनलवरील 'टॉक्सिक'चा टीझरला 24 तासांत 3 कोटी 60 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. याशिवाय या टीझरला 5 लाख 51 हजार लाईक्स मिळाले आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीतील हा एक नवा विक्रम असल्याचं म्हटलं जात आहे. यापूर्वी 'पुष्पा 2' चित्रपटाच्या टीझरला 24 तासांत 2 कोटी 70 लाख व्ह्यूज मिळाले होते. 'टॉक्सिक'चा टीझर सध्या सोशल मीडियावर चांगलाचं धुमाकूळ घालत आहे. दरम्यान ज्युनियर एनटीआर स्टारर 'देवरा' हा चित्रपट 2 कोटी 17 लाख व्ह्यूजसह तिसऱ्या स्थानावर आहे. 'गुंटूर कारम'चा टीझर हा चौथ्या स्थानावर आहे. याशिवाय 'कांगुवा'चा टीझर पाचव्या स्थानावर आहे.
BREAKING: Yash's Toxic BEATS Allu Arjun's Pushpa 2 to become the most viewed Indian glimpse in first 2️⃣4️⃣ hrs.
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) January 8, 2025
यशच्या बहिणीची भूमिका कोण करणार ? : गीतू मोहनदास दिग्दर्शित 'टॉक्सिक: अ डार्क फेयरीटेल' मध्ये यश महत्त्वाची भूमिका साकारत आहे. एका रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात यशच्या बहिणीची भूमिका करणारी नयनतारा करणार असल्याचं समजत आहे. 'टॉक्सिक' चित्रपटाची नायिका कियारा अडवाणी आहे. या चित्रपटात हुमा कुरेशी आणि तारा सुतारिया यांच्यासह अनेक मोठ्या स्टारकास्ट आहेत. दरम्यान या स्टारकास्टची अद्याप पुष्टी झालेली नाही. हा चित्रपट परदेशी भाषांमध्ये डब केला जाईल.
हेही वाचा :