Video : '...मग अयोध्येत रामाला कोणता चेहरा दाखवणार' - खासदार नवनीत राणांची टीका - Navneet rana hanuman chalisa
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई - राणा यांच्या इमारतीबाहेर शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा करायला जाऊ शकत नाही. शिवसेनेकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. तसेच त्यांना घराबाहेर येण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान खासदार नवनीत राणा यांनी एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. नवनीत राणा म्हणाल्या, शिवसैनिकांना भडवण्यात येत आहे. ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नाही आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडले आहे. शिवसेनेचे नेते अयोध्येला जाणार आहेत. पण जर मातोश्रीसमोर हनुमान चालीसा वाचायला देत नाही, तर मग अयोध्येत जाऊन रामाला कोणता चेहरा दाखवणार, अशी टीका त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे. तसेच मातोश्रीसमोर हनुमान चालीसा वाचणार असल्याचाही पुनरूच्चार त्यांनी केला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST