श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त नाशिक रामकुंड येथे भव्य दीपोत्सव; पाहा व्हिडिओ - अभिषेक सोहळा
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 11, 2024, 10:35 PM IST
नाशिक Ramkund Deepotsav : रामनगरी आयोध्येमध्ये (२२ जानेवारी) रोजी श्रीराम प्रभूचा अभिषेक सोहळा होतोय. त्या सोहळ्यामुळं देशात सर्वत्र वातावरण भक्तीय झाल्याचं पाहायला मिळतय. याच दिवशी राम मंदिराचं उद्घाटनही होणार आहे. या निमित्तानं नाशिकमध्ये अक्षय ऊर्जा फाउंडेशनच्या (Akshay Urja Foundation) वतीनं पंचवटी रामकुंड येथे भव्य दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गोदावरी (Godavari) नदीच्या तीरावर हजारो दीपक प्रज्वलित करण्यात आले. तसेच गंगापूजन करून आरती करण्यात आली. या कार्यक्रमाला नाशिककरांनी मोठी गर्दी केली होती. नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सव होत असून या निमित्तानं पर्यटन स्थळांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गंगाघाट परिसरातील अनेक मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या विद्युत रोषणाईमुळं गंगाघाट परिसर झळाळून निघालाय.