नाशिकच्या सिन्नर एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग; बॉयलर फुटल्यानं झाला स्फोट, पाहा व्हिडिओ - अग्निशमन बंब
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 30, 2023, 10:36 AM IST
नाशिक Nashik Fire News : शुक्रवारी (29 डिसेंबर) रात्री 8 वाजेच्या सुमारास सिन्नर-माळेगाव औद्यागिक वसाहतीतील 'हिंदुस्तान ग्लास लिमिटेड' या काच तयार करणाऱ्या कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली. स्फोटानंतर सिन्नर एमआयडीसीसह सिन्नर नगरपालिकेचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. बॉयलर फुटल्यामुळं स्फोट झाला आणि त्यानंतर ही आग लागली असल्याचं सांगितलं जातंय. घटना घडली त्यावेळी कंपनीमध्ये कामगार काम करत होते. कामगारांनी सावधानता बाळगत बाहेर धाव घेतली. त्यानंतर लगेच या घटनेची माहिती अग्निशमन दलास देण्यात आली. आगीमुळं परिसरात सर्वत्र काळा धूर पसरला होता. ते बघून आसपास असणाऱ्या इतर कंपनीतील कामगारांनी मदतीसाठी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते. अखेर रात्री दोन वाजेच्या सुमारास अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आलं.