Nana Patole मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघे मोदी - शहाचे हस्तक: नाना पटोले - Chief Minister and Deputy Chief Minister
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16399823-thumbnail-3x2-patole.jpg)
वेदांता- फॉक्सवॉन प्रकल्प गुजरातला घालवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister and Deputy Chief Minister) हे मोदी-शहांचे हस्तक आहेत. त्यांना महाराष्ट्राचे व येथील जनतेचे काहीही देणे घेणे नाही, अशी जहरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole severely criticized) यांनी केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या वतीने, पश्चिम महाराष्ट्र कार्यकर्ता मंथन शिबिराचे आयोजन काँग्रेस भवन येथे करण्यात आले होते. काल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर टीका केली. याबाबत नाना पटोले यांना विचारले असता ते म्हणाले की, ते स्वतः हा भय आणि भ्रष्टाचारामुळे तिथे गेले आहेत. ज्यांना काँग्रेसने मोठ केले, तेच आत्ता काँग्रेसवर बोलत असतील तर त्यांच्यावर काय बोलायचे, असे देखील यावेळी नाना पटोले म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST