उच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर तरी निवडणूक आयोगानं सुधारलं पाहिजे - नाना पटोले
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर : निवडणूक आयोगावर केंद्र सरकारचा किती मोठा दबाव आहे, हे काल उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला फटकारल्यावरून स्पष्ट झालेलं आहे. लोकसभेची मुदत संपायला जर वर्ष शिल्लक असताना खासदाराचा मृत्यू झाला तर निवडणूक घ्यावी लागते हा नियम आहे. पण केंद्र सरकारच्या दबावात येऊन निवडणूक आयोग वागत आहे हे योग्य नाही. भारतीय जनता पक्षाच्या माईंडकडून महाराष्ट्र जो पेटवला गेलेला आहे, तो आधी शांत केला पाहिजे अशी भूमिका नाना पटोलेंनी मांडली आहे. एकीकडे जरांगे पाटील छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीसांवर टीका करतात. काय चाललंय सरकारमध्ये? महाराष्ट्रात महाराष्ट्र पेटवण्याची भूमिका यांनी घेतली आहे, आज आपण बघतोय की संपूर्ण राज्यात जुन्या पेन्शनसाठी संप सुरू झाला आहे. शासकीय कार्यालये ओस पडलेली आहेत. आज शेतकरी आत्महत्या करतोय, तो ओबीसी आहे आणि मराठा देखील आहेत. पण या सरकारला त्याचही घेणं देणं नाही.