Nagpur rain update : रात्रभर झालेल्या पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो,तलावाच्या दिशेकडे वळू लागली पर्यटकांची पावले - नागपूर पाऊस
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर: रात्रभर झालेल्या अति-मुसळधार पावसामुळे नागपूर शहरातील अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. एकाच दमदार पावसामुळे तलाव भरल्याने परिसराचे सौंदर्य अधिक खुलले आहे. नागपूरातील पर्यटकांना अंबाझरी तलावाचे आकर्षण असते. मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने नागपूरचे हौशी लोक तलावावर फेरफटका मारण्यासाठी येऊ लागले आहेत. याच अंबाझरी तलावातून नागपुरातील बहुतांश भागात पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे यावर्षी हे तलाव लवकर भरल्याने नागपूरकर सुखावले आहेत. गेल्या 8 तासात नागपूर जिल्ह्यात पावसाचा अक्षरशः हाहाकार अनुभवायला मिळाला आहे. प्रादेशिक वेधशाळेच्या माहितीनुसार गेल्या 8 तासाच्या कालावधीत नागपुरात तब्बल 121 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात 164 मिलिमीटर पाऊस इतक झाला आहे. आज सकाळपासूनचे पावसाची रिपरिप सुरू आहे, त्यामुळे आत्तापर्यंत नागपूर येथे 71 मिलिमीटर पाऊस झाला आहे.