Nagpur News : गुन्हा दाखल करण्यासारखं उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर काहीच घडलं नाही- पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती - BJP Pushkar Poshattiwar
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 18, 2023, 10:30 PM IST
नागपूर Nagpur News : पश्चिम नागपूर भाजप पदाधिकारी पुष्कर पोशेट्टीवार (BJP Pushkar Poshattiwar) यांचा उपमुख्यमंत्री निवासस्थान देवगिरी येथे डीसीपी राहुल मदने (DCP Rahul Madane) यांच्यासोबत वाद झाला होता. यासंदर्भात आज शिवसेना राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ट्विट केल्यानंतर नागपुर शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या शासकीय निवासस्थान देवगिरी येथे मंगळवारी पोलीस आणि भाजप पदाधिकारी यांच्यामध्ये कोणताही वाद झालेला नाही. काही लोकं समाज माध्यमांवर विनाकारण चुकीच्या बातम्या पसरवत आहेत.
पोलीस कर्मचाऱ्यांसोबत वाद : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या शासकीय निवासस्थानी पुष्कर पोशट्टीवार नावाचा कार्यकर्ता आत जाण्यासाठी घाई करताना, बंदोबस्तासाठी असलेल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांसोबत त्याचा वाद झाला. त्यावेळी झोन 2 चे पोलीस उपायुक्त राहुल मदने तिथे होते. तिथे झालेल्या वादाच्या वेळेस तिथे उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यानी हस्तक्षेप केला. त्यानंतर वाद घालणाऱ्या त्या व्यक्तीनं लगेच माफी मागून लगेच विषय संपला होता. मंगळवारच्या घटनेत गुन्हा दाखल होईल किंवा अदखलपात्र नोंद होईल असं काही ही घडलं नाही. असं पोलीस आयुक्त यांनी म्हटंल आहे.