Mumbai Rain Update: मुंबईकरांच्या घरात शिरले पावसाचे पाणी, तर रस्ते वाहतुकीवरही झाला परिणाम, दुपारपर्यंत एकूण १० जणांचा मृत्यू - मुंबई पाऊस
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : मुंबईतील बोरीवली पश्चिम येथील गणपत पाटील नगरमध्ये सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वाटेत साचलेले पाणी नद्यांसारखे दिसत होते. पावसाचे पाणी घरांमध्ये शिरले आहे. व्हिडिओमध्ये घर पाण्याने भरलेले दिसत आहे. ती व्यक्ती पाणी घराबाहेर टाकण्याचे काम करत आहे. नागरिक मात्र या पावसामुळे आता त्रस्त होताना दिसत आहे. पावसाळ्यात नेहमीच मुंबईकरांची तारांबळ उडत असते, त्यामुळे घरात पाणी शिरणे ही गोष्ट त्यांच्यासाठी काही नवीन नाही. गेल्या सहा दिवसांत मुसळधार पाऊस सुरू आहे. याचा परिणाम वाहतुकीवरही होत आहे. पाणी साचल्यामुळे अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. चाकरमानी अगदी हैराण झाले आहेत. लोकलवरही याचा परिणाम झाल्याचे दिसत आहे. पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पाणी साचल्यामुळे अंधेरी सबवे देखील वाहतुकीसाठी काही वेळ बंद करण्यात आला होता. मुंबईतील या पावसाच्या कहरामुळे आतापर्यंत एकूण १० जणांचा मृत्यू झाला आहे.