Mumbai rain - मुंबईत २४ तासांपासून पावसाची संततधार; गुरुवारी मुसळधार पावसाची शक्यता - मुंबई पाऊस

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Aug 10, 2022, 8:53 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

मुंबई - मुंबईत गेल्या 24 तासांपासून पावसाची संततधार ( Continuous rain in Mumbai for 24 hours ) सुरू आहे. बुधवारी सकाळी मान्सूनने हजेरी ( Mumbai rain ) लावली. भाईंदर, मीरा रोड, दहिसर, बोरिवली, कांदिवली मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, वांद्रे, दादर आदी भागात कमी अधिका प्रमाणात ( Mumbai weather ) पाऊस सुरूच होता. मुंबईत आठवडाभर आकाश ( Mumbai rain update ) ढगाळ राहणार असून, सोमवार ते गुरुवारपर्यंत ( Mumbai rain forecast ) मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे तर शुक्रवारी आणि शनिवारीही मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज विभागाने जारी केला आहे. या आठवड्याच्या अखेरीस कमाल तापमान 28 आणि किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने आपल्या अंदाजात नमूद केले आहे. बुधवारी पूर्व विदर्भातील सर्व जिल्हे, तसेच कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी व मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.