मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज वाहतूक बंद; नेमकं कारण काय? - राष्ट्रीय महामार्ग विभाग

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 28, 2023, 10:24 AM IST

पिंपरी चिंचवड (पुणे) Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कि.मी. 33/800 येथे खोपोली ते पालीफाटा (एन.एच.166 डी) या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून पुलाचं गर्डर बसविण्याचं काम आज (28 नोव्हेंबर) करण्यात येणार आहे. यावेळी पुणे वाहिनीवरील वाहतूक दुपारी 12 ते 3 वाजेच्या कालावधीत पर्यायी मार्गानं वळविण्यात येणार आहे. तर या कालावधीत मुंबईकडून पुण्याकडं जाणारी वाहतूक द्रुतगती मार्गाच्या मुंबई वाहिनीमधून अंदाजे 1 कि.मी. लांबीसाठी पुण्याच्या दिशेनं प्रतिबंधित वेगानं वळविण्यात येणार आहे. निर्धारित वेळेत गर्डरचं काम पूर्ण झाल्यावर पुण्याकडील वाहतूक पूर्ववत केली जाणार असल्याची माहिती यंत्रणांकडून देण्यात आलीय. तसंच या कालावधी दरम्यान द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 9822498224 वर किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या 9833498334 या क्रमांकावर सपंर्क साधावा, असं महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाच्या वतीनं कळविण्यात आलंय. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.