पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग आज दोन तास राहणार ब्लॉक; जाणून घ्या काय आहे कारण - शेडुंग टोल नाका
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 23, 2023, 7:24 AM IST
पुणे Mumbai Pune Expressway block : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरुन जाणाऱ्या वाहनांना आज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री उभारण्याचं काम करण्यात येत आहे. त्यामुळे हा महामार्ग दोन तासासाठी ब्लॉक करण्यात येणार आहे.
यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे वाहिनीवर 35/500 किमी इथं गॅन्ट्री उभारण्याचं काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू आहे. आज दुपारी 12 ते 2 या वेळेत पुण्याहून मुंबईकडं जाणारी वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे. या कालावधीत पुण्याहून मुंबईकडं जाणारी हलकी वाहनं मॅजिक पॉइंट 42/100 इथून वळवून राज्य महामार्ग क्रमांक 48 जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून खोपोली शहरातून शेडुंग टोल नाका इथं अथवा खोपोली शहरातील इंदिरा चौकातून द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवरून मुंबईकडं मार्गस्थ करण्यात येणार आहेत. तसेच पुण्याहून मुंबईकडं जाणारी हलकी वाहनं आणि बस खोपोली एक्झिट 39/800 इथून वळवून राज्य महामार्ग क्रमांक 48 जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून खोपोली शहरातून शेडुंग टोल नाका इथं अथवा खोपोली शहरातील इंदिरा चौकातून द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवरून मुंबईकडं मार्गस्थ करण्यात येणार आहेत. गॅन्ट्री बसविण्याचं काम पूर्ण झाल्यावर दुपारी 2 वाजता द्रुतगती मार्गावरील पुण्याहून मुंबईकडं जाणारी वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्र. 9222498224 वर किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या दूरध्वनी क्रमांक 9833498334 वर संपर्क साधावा, असं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं कळवलं आहे.