मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बसचा अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, 10 प्रवासी जखमी - खोपोली

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 10, 2023, 11:39 AM IST

Updated : Dec 10, 2023, 12:22 PM IST

 मावळ-खोपोली Mumbai Pune express highway Bus Accident  :  मुंबई-पुणे महामार्गावर खोपोली हद्दीत मुंबईवरून कोल्हापूरला जाणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये बस चालकाचा जागीच मृत्यू झाला तर 10 प्रवासी जखमी झाले आहेत. पुणे लेनवर हा अपघात झाला असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अपघातग्रस्त बस वैभव ट्रॅव्हल्स कंपनीची होती. बसला दुसऱ्या वाहनांन मागून धडक दिल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. विविध यंत्रणांनी बचावकार्य करत जखमींवर प्राथमिक उपचार केले. अपघातग्रस्त बसमुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी अपघातग्रस्त बस बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली. दरम्यान, मुंबई पुणे-एक्सप्रेसवेवरील अपघाताच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं बघायला मिळतंय. 

Last Updated : Dec 10, 2023, 12:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.