Pune Traffic Jam: मुंबई बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प; तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : मुंबई बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वडगाव बुद्रुक येथील मुठा नदी पुल परिसरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झालेली आहे. नदी पुलापासून नविन कात्रज बोगद्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यामुळे वाहन चालक, नागरिक, कामगार, विद्यार्थी हैराण झाले आहेत. वडगाव, धायरी, नऱ्हे,आंबेगाव परिसरातील सर्व रस्ते वाहतूक कोंडीमुळे ठप्प झाले आहेत. पुणे शहरात मध्यरात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. शहरात देखील ठिकठिकाणी रस्त्यांवर वाहतूक कोंडी पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना या वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. चाकरमान्यांना कामावर जायला देखील उशीर झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज दिवसभरात शहरात ढगाळ हवामान आणि पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे पुणेकरांना आज कामावर निघताना पावसाळी रेनकोट आणि छत्री सोबत ठेवावी लागणार आहे.