MPSC Students Protest : एमपीएससी मुख्य परीक्षा पॅटर्न बदलण्यावरून विद्यार्थ्यांचे आंदोलन
🎬 Watch Now: Feature Video
पुणे राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न 2025 पासून राबविण्यात यावा या मागणीसाठी एमपीएससी विद्यार्थ्यांनी आंदोलन MPSC Student Protest केले आहे. पुण्यातील शास्त्री रोडवरील अहिल्यादेवी शिक्षण मंडळ संस्थेच्या समोरील रस्त्यावर हे आंदोलन करण्यात Protest At Ahilya Devi Education Board Institute आले आहे. या आंदोलनात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले असून जोरदार घोषणा देण्यात येत आहेत. आम्ही विद्यार्थी मागील अनेक वर्षांपासून राज्यसेवा परीक्षेची तयारी करीत आहोत. पण अचानक आयोगाकडून आदेश काढला जातो. 2023 पासून तुमच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येत MPSC Main Exam Pattern Changed आहे. हा निर्णय आम्हाला मान्य नाही. आयोगाने 2025 मध्ये तो नियम लागू करावा अशी आमची राज्य सरकारकडे मागणी आहे. अशी मागणी यावेळी या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी या आंदोलनामध्ये एका विद्यार्थ्यांनी आपली व्यथा मांडत सांग एमपीएससी तुझ्यासाठी काय करू ही कविता सादर केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST