MP Sanjay Raut खासदार संजय राऊत यांची जामीनावर सुटका; राऊतांच्या घराबाहेर लागला डीजे - MP Sanjay Rau
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी Money laundering case शिवसेना नेते संजय राऊत Shiv Sena leader Sanjay Raut यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. 1 ऑगस्ट रोजी ईडीने अटक केलेल्या संजय राऊतला तीन महिन्यांनी जामीन मिळाला. संजय राऊत यांना 2 लाख रुपयांच्या जामिनावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. ईडीने या निकालाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. त्यांनी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी वेळ मागितला आहे. संजय राऊत यांना न्यायालयाने जामीन जाहीर करताच त्यांच्या समर्थकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. राऊतांच्या घराबाहेर लागला डीजेमागचे शंभर दिवसांमध्ये तुरुंगात असलेल्या संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांच्या मुंबईतील मैत्री या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. तसेच संजय राऊत यांच्या अटकेनंतर चर्चेत आलेली त्यांची आई यांनी देखील खिडकीमध्ये येऊन सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले व त्यांना हात दाखवून त्यांना अभिवादन केले. संजय राऊत यांच्या घराबाहेर सध्या दिवाळीचे वातावरण असून त्यांच्या घराबाहेर डीजे देखील लावला जात आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST