... तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील - संजय राऊत - राज्यसभा निवडणूक

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jun 12, 2022, 3:46 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

मुंबई - आमच्या हातात दोन दिवस ईडी दिली तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील. ( Devendra Fadnavis ) मला हे सगळ माहिती आहे म्हणून मी हे बोललो, अशी टीका खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांनी भाजपवर केली आहे. एक विजयी झाला आणि एक पराभूत झाला या निवडणुकीमध्ये. याचा अर्थ अणुबॉम कोसळला असे होत नाही किंवा महाप्रलय आला आणि सगळं वाहून गेले, असेही होत नाही. अनेक राज्यांमध्ये असे निकाल लागले आहेत. राजस्थानमध्ये काँग्रेस जिंकली आहे. हरियाणामध्ये निवडणूक आयोग आणि भाजप मिळून रडीचा डाव खेळला. महाराष्ट्रातही निवडणूक आयोगाला हाताशी धरुन रात्रीचा अंधारामध्ये इकडचे नेते काय करत होते याची सगळी माहिती आम्हाला आहे. तिकडल्या गृह खात्यात लोकांना कसे फोन जात होते ? कोणाचे मत बाद करायचे ? कशी चर्चा सुरू होती ? याची सर्व माहिती आम्हाला आहे. यंत्रणा आमच्याकडेही आहेत फक्त ईडी नाही. जर आमच्याकडे 48 तास ईडी दिली. भाजपही शिवसेनेला मतदान करेल, असेही संजय राऊत म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.