Mumbai Rain Update: मुंबईसह 'या' उपनगरांमध्ये लावली आज पावसाने हजेरी - मुंबईत पाऊस
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/640-480-18731310-thumbnail-16x9-mumbai-rain.jpg)
मुंबई : मुंबईसह कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, दहिसर, विलेपार्ले या उपनगरांमध्ये पावसाचे आगमन झाले आहे. रविवारी रात्री हलक्या पावसानंतर आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू झाला. हा व्हिडीओ कांदिवली आणि मालाड भागातील आहे. या व्हिडीओत काळ्या आणि दाट ढगांनी पाऊस पडत असल्याचे दिसत आहे. पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांची उकाड्यातून सुटका झाली आहे. सकाळीच पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात आता गारवा निर्माण झालेला आहे. नागरिकांना आज उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मुंबईत पावसाने हजेरी लावली असली तरी कुठेही पाणी साचलेले दिसत नाही. मात्र, सकाळी सकाळीच पावसाने हजेरी लावल्यामुळे मात्र कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची एकच तारांबळ उडाली होती. रविवारी राज्यात दक्षिण कोकणात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. राज्यात पुढच्या 4 ते 5 दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता अनेक ठिकाणी वर्तविली जात आहे.