VIDEO :'...अन्यथा मनसैनिकांच्या लोंढ्यात चिरडून जाल'; मनसेचा भीम आर्मीला इशारा - राज ठाकरे जाहीर सभा
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे - 1 मे रोजी औरंगाबाद येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जाहीर सभा होणार असून त्याचे पडघम आत्तापासूनच वाजू लागले आहेत. 3 मे अर्थात ईद पर्यंत सर्व मशीदींवरील भोंगे उतरवण्यासाठी अल्टीमेटम मनसेकडून देण्यात आला आहे. त्यावर आपला पक्ष ठाम असल्याचे मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी भोंगे उतरविण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वडिलांचा शब्द खरा ठरवावा असे आवाहन देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले. औरंगाबाद येथील सभेविरोधात भीम आर्मीने पवित्रा घेतला आहे. त्यांनी आमच्या आसपास येऊ नये अन्यथा मनसैनिकांच्या लोंढ्यात चिरडले जाल असा धमकीवजा इशाराही जाधव यांनी दिला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST