Yogesh Kadam On Uddhav Thackeray मुख्यमंत्री असताना ठाकरेंनी अडीच वर्षात सीमाप्रश्न का हाताळला नाही, आमदार योगेश कदमांचा सवाल - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
🎬 Watch Now: Feature Video
रत्नागिरी महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावरून शिंदे फडणवीस सरकारवर टीका करणारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या अडीच वर्षांच्या कालावधीत हा प्रश्न का हाताळला नाही, असा सवाल शिंदे गटातील दापोली- खेडचे आमदार योगेश कदम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उपस्थित केला आहे. तसेच शिवसेनेतील ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्यावर बेळगाव लढ्यात गुन्हा दाखल झालेला असताना त्यांना पक्षातून बाजूला करण्याचे षडयंत्र केले गेले. त्यावेळी तुमची भूमिका नेमकी काय होती, असा सवाल देखील आमदार योगेश कदम यांनी उपस्थित केला आहे. ते आज खेडमध्ये बोलत होते. महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद हा भाजप- शिवसेना सरकार योग्य पद्धतीने सोडवेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST