Kapil Patil : जातीनिहाय जनगणना करण्यासाठी आमदार कपिल पाटील आक्रमक; पाहा काय म्हणाले? - MLA Kapil Patil Demand for caste wise census

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 25, 2023, 10:32 PM IST

मुंबई : विधान परिषदेत महाराष्ट्रात सुद्धा बिहार राज्याप्रमाणे जातीनिहाय जनगणना व्हावी, अशी मागणीही आमदार कपिल पाटील यांनी केली. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जातीनिहाय जनगणना व्हायलाच पाहिजे. बिहार सरकारच्या नितीश कुमार यांनी जातीनिहाय जनगणना सुरू केली आहे. यासाठी ओबीसी समाजाची संख्या किती आहे हे सुद्धा यातून स्पष्ट होणार आहे. आमचा ही जातीनिहाय जनगणना करण्यासाठी विरोध नाही.यासाठी महाराष्ट्रात एक समिती गठीत करण्यात येईल. व ही समिती बिहारला जाईल तिथे अभ्यास करेल व नंतर त्याच पद्धतीने महाराष्ट्रात सुद्धा जातीनिहाय जनगणना करण्यासाठी निर्णय घेतला जाईल.

 

शिक्षकांच्या प्रश्नावर सरकार सकारात्मक : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप आज वाजले. या अधिवेशनात अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली असली तरी शिक्षकांचा मुद्दाही मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत राहिला. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी ऐन दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू असताना शिक्षकानी संपाची हाक दिल्याने हा मुद्दा चिघळला होता. परंतु याचा कुठलाही परिणाम विद्यार्थ्यांच्या परीक्षा व निकालावर होणार नसल्याचेही सांगण्यात आले होते. शेवटी शिंदे - फडणवीस सरकारनेही जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतल्याने शिक्षकांना मोठा दिलासा भेटला आहे. त्याच सोबत शिक्षक भरती प्रक्रिया सुद्धा लवकर राबवण्यात येणार असून तशी पावले ही उचलली गेली आहेत.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.