कडूंचा सरकारला इशारा! आमदार राणाला आवरा; अन्यथा मला निर्णय घावा लागेल; पाहा रिपोर्ट - Former Minister Bachu Kadu
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16750047-1063-16750047-1666784201716.jpg)
नागपूर - माजी मंत्री बच्चू कडू आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केलेल्या राजकीय चिखलफेकीनंतर ते चांगलेच संतापलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळीच या प्रकरणात मध्यस्थी करून रवी राणा यांना आवर घातली नाही, तर 1 नोव्हेंबर रोजी राजकीय भूमिका स्पष्ट करेल असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. रवी राणांच्या आरोपांमुळे मी एकटाच व्यथित झालेलो नसून सर्व 50 आमदार नाराज असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. रवी राणांचे खोटे नाटे आरोप मी कदापिही सहन करणार नाही, असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिला आहे. तसेच, मी दोघांनाही न्यायालयीन नोटीस पाठवणार असल्याच देखील ते म्हणाले आहेत. दरम्यान, या सर्व परिस्थितीवर आमचे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी कडू यांच्याशी 'ईटीव्ही भारत'च्या माध्यमातून संवाद साधला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST