Mumbai Fire News : मानखूर्दमधील भंगार कंपाउंडला भीषण आग, मोठे नुकसान झाल्याचा अंदाज - मानखुर्द आग घटना
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : मायानगरीत नेहमीच आगीच्या घटना घडतात. मानखुर्द परिसरातील मांडला येथील भंगार कंपाऊंडमध्ये आज पहाटे भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या आणि स्थानिक पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे धुराचे लोट दूरवर पसरले दिसून येत आहे. या आगीत मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली आहे.
आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. भीषण आग पाहात अग्निशमन दलाच्या डझनहून अधिक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. आगीचे नेमके कारण काय हे याचा पोलीस तपास करत आहेत. घटनास्थळी स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी पोहोचले आहेत. अग्निशमन दलाचे अधिकारी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवर दिसत आहेत. घटनास्थळी रद्दी आणि रिकामे तेलाचे कँड यामुळे आग पसरत गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सतत आगीच्या घटना वाढत असताना नागरिकांनी काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
हेही वाचा- BMC Election : आता वेळ न घालवता मुंबई पालिकेची निवडणूक घ्या - माजी गटनेते प्रभाकर शिंदे