Nandurbar Fire News : शोरूमला भीषण आग लागल्याने 20 पेक्षा अधिक ट्रॅक्टर जळून खाक, कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज - नंदुरबार आग शोरुम ट्रॅक्टर
🎬 Watch Now: Feature Video
नंदुरबार - शहादा शहरातील राज मोटर्स या आयशर ट्रॅक्टरच्या शोरूमला रात्री बारा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली आहे. आगीत वीसपेक्षा अधिक ट्रॅक्टर जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यात ट्रॅक्टर शोरूमचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रात्रीच्या सुमारास लागलेली आग विझवण्यासाठी शहादा अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. पहाटेपर्यंत आग विझविण्यात अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. मात्र यात शोरूमचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शोरूमला लागलेल्या आगीने उग्ररूप धारण केल्यानंतर आग संपूर्ण परिसरात पसरली. शोरूम आणि परिसरात लावलेली ट्रॅक्टर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहेत. राज मोटर्स हे शोरूम पूर्ण जळून गेल्याने इतर महत्वाच्या साहित्याचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे आग कशामुळे लागली हे कारण अजून समोर आले नसले तरी कोट्यवधी रुपयाचा साहित्याचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याबाबत पोलीस प्रशासनाकडून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.