Maratha Reservation : मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज प्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा...मराठा क्रांती मोर्चा आक्रमक - Maratha Reservation Issue
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 1, 2023, 10:28 PM IST
पुणे Maratha Reservation : जालना अंतरवाली गावात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आलाय. अंतरवाली सराटी गावात तणावपूर्ण स्थिती झाली आहे. गावकऱ्यांकडून दगफेड करण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे. मराठा आक्रोश मोर्चाचा आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस सुरू होता. चर्चेनंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याचेही सांगण्यात येत आहे. पुण्यात देखील मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाली असून यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी या प्रकरणी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी मराठा क्रांती मोर्चे कडून करण्यात आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज वरून सरकारवर टीका केलीय. त्यांनी एक्स या सोशल मीडियात पोस्ट केली आहे. अशोक चव्हाण यांनी पोस्टमध्ये म्हटलयं, की मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारने समाजाचा अंत पाहू नये. या गंभीर प्रश्नावर केवळ वेळकाढूपणा होत असल्याने समाज संतप्त आहे. बळाचा वापर करून हे आंदोलन चिरडता येणार नाही. त्याऐवजी मराठा आरक्षण कसे देणार, याबाबत राज्य सरकारने स्पष्ट भूमिका जाहीर करावी. ठोस पावले उचलावीत. नेमके हेच केले जात नसल्याने मराठा समाजातील आक्रोश तीव्र होत आहे.