Manoj Jarange Patil Sabha Today : मनोज जरांगे पाटील यांची आज राजगुरुनगरमध्ये सभा; लाखो मराठे एकवटणार, पहा ग्राउंड रिपोर्ट - मराठा आरक्षण लढा
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 20, 2023, 7:55 AM IST
पुणे Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा सुरू केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आता राज्यभर दौरा सुरू केला आहे. मनोज जरांगे पाटील यांची तोफ आज पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर इथं ( Manoj Jarange Patil Sabha Today ) धडाडणार आहे. आज सकाळी 10 वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. मराठा समाजाला इतर मागासवर्गातून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी चंग बांधला आहे. आजच्या सभेला मोठी गर्दी होणार आहे. राज्यभरातून लोकं या सभेला येणार आहेत. सभेच्या ठिकाणाहून ईटीव्ही भारतनं आढावा घेतला आहे. मराठा बांधव म्हणाले की, आम्ही क्रांती घेऊन आलो आहोत. आम्ही १४७ मराठा आमदार दिले आहेत. मात्र, या आमदारांनी गनिमी कावा केला. त्यांनी मराठा आरक्षणासाठी मदत केली नाही. आमची मुलं ऊसतोड कामगार आहेत. ९९ टक्के घेऊन आमची मुलं ७० टक्के मिळविलेल्यांच्या हाताखाली काम करत आहोत. सरकारला आम्ही सळो की पळो करू, असा इशारा यावेळी मराठा बांधवांनी दिला आहे.