Ajit Pawar Meeting Issue: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मराठा आरक्षण संदर्भातील बैठकीत प्रचंड गोंधळ, पाहा व्हिडीओ - Maratha reservation issue
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/15-08-2023/640-480-19270926-thumbnail-16x9-kolhapur.jpg)
कोल्हापूर : आज कोल्हापुरामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर त्यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा आरक्षणाच्या प्रश्नांसाठी आयोजित केलेल्या बैठकीत मोठा गोंधळ झाला आहे. यावेळी मराठा वनवास यात्राचे अध्यक्ष योगेश केदार आणि त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरच मोठा गोंधळ घातला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यावेळी पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता कार्यकर्त्यांनी पोलिसांशीच हुज्जत घालत गोंधळ घातला आहे. बैठकीत मराठा वनवास यात्राचे अध्यक्ष योगेश केदार यांनी, आम्हाला मराठा आरक्षणाच्या बैठकीपासून लांब ठेवले जात आहे. केवळ कोल्हापूरसाठीच ही बैठक मर्यादित आहे का? आम्हाला सुद्धा बोलण्याची संधी द्यावी, असे म्हणत त्यांनी गोंधळ घातला आहे. पोलीस आणि आंदोलकामध्ये जोरदार बाचाबाची झाली.