Maratha Reservation: लोकप्रतिनिधीच्या सांत्वनाची गरज नाही, भाऊसाहेब शेळकेंनी सुनावले 'या' आमदाराला खडेबोल, पाहा व्हिडिओ - देविदास पाठे यांचं उपोषण
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 11, 2023, 4:25 PM IST
|Updated : Sep 11, 2023, 5:27 PM IST
छत्रपती संभाजीनगर Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी विविध ठिकाणी आंदोलनं, उपोषणं होत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून कायगाव येथील हुतात्मा काकासाहेब शिंदे स्मारकाजवळ 'शिवबा' संघटनेचे संपर्कप्रमुख देविदास पाठे पाटील उपोषणास बसलेले आहेत. त्यांची प्रकृती रविवारी दुपारी खालावली होती. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात भरती होण्यास सांगितलंय. प्रकृती खालवली असल्याने त्यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यानंतर गंगापूरचे आमदार प्रशांत बंब हे त्यांना भेटण्यासाठी आले होते. लोकप्रतिनिधींनी प्रश्न मांडावे, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत एकाही लोकप्रतिनिधीनं आम्हाला भेटू नये. तुमच्या सांत्वनाची आम्हाला गरज नाही, असे म्हणत भाऊसाहेब शेळके यांनी आमदार प्रशांत बंब यांना खडेबोल सुनावलेत. गेल्या आठ दिवसांपासून देविदास पाठे पाटील हे आमरण उपोषणाला बसले होते. आठ दिवसात आमदार प्रशांत बंब यांनी एकदाही उपोषणस्थळी भेट दिली नाहीच. त्यामुळं त्यांच्या विरोधात रोष व्यक्त केल्याचं भाऊसाहेब शेळके पाटील यांनी म्हटलंय.