'भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा', मराठा आंदोलकांची मागणी - bhujbal resign from the post of minister
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 20, 2023, 1:19 PM IST
पुणे Maratha Protestors On Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील राज्यभर सभा घेत आहेत. आज (20 नोव्हेंबर) पुण्यातील खराडी भागात जरांगे पाटील यांची सभा पार पडणार आहे. त्यामुळं जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ लाल महाल परिसरातून बाईक रॅलीला सुरुवात झालीये. सभेच्या निमित्तानं पुणे नगर रस्त्यावरील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आलाय. आज दिवसभर नगर रोडवर जड वाहतुकीस पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे. तर नगर रस्त्यावरुन पुण्यात येणारी सर्व वाहनं हडपसरच्या बाजूनं वळवण्यात येणार आहे. दरम्यान, यावेळी बोलत असताना मराठा आंदोलकांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. भुजबळांनी केलेली विधानं चूकीची आहेत. आज जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा काम ते करताय. आज भुजबळांना पुण्यातूनच नव्हे तर संपूर्ण राज्यातून विरोध होत आहे. तसंच भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा त्यानंतर सभा घ्याव्या, असं मराठा आंदोलकांनी म्हंटलंय.