Maratha Protest : बीड जाळपोळ प्रकरणी 99 मराठा आंदोलक पोलिसांच्या ताब्यात - आमदार संदीप क्षीरसागर

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 1, 2023, 8:06 PM IST

बीड Maratha Protest : बीड जिल्ह्यात दगडफेक, जाळपोळ करणाऱ्या 99 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यत घेतलं आहे. तसंच या आदोलकांवर कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत सहभागी नसलेल्या नागरिकांना सोडून देण्याची विनंती मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी आज पोलिसांकडं केली आहे. मात्र, घटनेत सहभागी असणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी विनंती मराठा समन्वयकांनी पोलीस महानिरिक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांच्याकडं केली आहे. बीडमध्ये मराठा आंदोलनानं हिंसक वळण घेतलं होतं. मराठा आंदोलकांनी आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घराला आग लावल्याची घटना घडली होती. यानंतर काल बीडमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली. त्यानंतर बीड पोलिसांनी संचारबंदी लागू केली होती. विशेष म्हणजे बीड शहरात झालेल्या दगडफेक, जाळपोळ प्रकरणी बीड शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाणे, शहर पोलीस ठाणे, ग्रामीण पोलीस ठाण्यासह माजलगाव पोलीस ठाण्यात 307 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बीड शहरात आतापर्यंत 99 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून अन्य आरोपींची ओळख पटविण्याचं काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.