Protest in Beed: राजकीय भूकंपामुळे संतापलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांचे बोटावर शाई ऐवजी चुना लावून आंदोलन, पक्षांतर बंदी कायदा कठोर करण्याची मागणी - Social Activist Protest
🎬 Watch Now: Feature Video
बीड : बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्षवेधी आंदोलन केले आहे. मतदानावेळी बोटावर शाई नव्हे तर चुना लावा, हे आंदोलन करण्यात आले. लोकशाही वाचवण्यासाठी पक्षांतर बंदी कायदा कठोर करा, अशी प्रमुख मागणी या दरम्यान करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर या सामाजिक कार्यकर्त्यांनी बोटाला चुना लावून जोरदार घोषणाबाजी केली. सध्या राजकीय नेते जी भूमिका घेत आहेत. त्यामुळे राज्याचा विकास खुंटला आहे. हा जनतेच्या भावनाशी खेळ असून मतदानावेळी बोटावर शाही नव्हे तर चुना लावा, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली.
सध्या राज्यातील राजकारण हे गुंतागुंतीचे आहे. जनतेला वाऱ्यावर सोडले आहे, खुर्चीच्या मोहापायी फसवल्याचे पाहायला मिळते. या खुर्चीच्या मोहापायी कोण कोणत्या पक्षात कधी जाईल, याचा अंदाज हा सांगता येत नाही. यामुळेच जनतेतील मतांचा नेमका जनतेलाच काय फायदा? असा प्रश्नचिन्ह उभा राहत आहे, यामुळेच सामाजिक कार्यकर्त्यांनी गेल्या तीन वर्षांमध्ये दोन भूकंप राजकीय क्षेत्रात झाल्याने आता जनमानसात संताप व्यक्त होत आहे. त्यामुळेच आता मतदान करण्यावेळी लावण्यात येणारी शाईऐवजी चुना लावा आणि कसेही जनतेला फसवा, या दृष्टिकोनातून बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर चुना लावा आंदोलन सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. यात राज्यातील राजकारण किती खालच्या पातळीवर गेले आहे, हे दर्शवण्यात आले आहे. यावेळी आंदोलनकर्ते गणेश ढवळे यांनी चुना लावण्याची मागणी केली.