Maharashtra Monsoon Session 2023 : वारकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याप्रकरणी विरोधक आक्रमक; विधानभवनाच्या पायऱ्यावर सरकारच्या निषेधार्थ वाजवली टाळ - लाठीचार्जवरुन विरोधक आक्रमक
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी आधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील पहिल्या दिवशी मंडळाच्या कामकाजापूर्वीच विरोधक आक्रमक झाले. पोलिसांकडून पंढरपूर येथे वारकऱ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जवरुन विरोधक आक्रमक झाले. विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवरती सरकारविरोधात आंदोलन केले. विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांनी हातात टाळ घेतला होता. त्याचबरोबर विरोधकांनी सरकारचा निषेध करणारे फलक हातात घेतले होते. राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांनी आंदोलन केले. वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. याचा निषेध करण्यासाठी विरोधकांनी टाळ वाजवत सरकारविरोधात आंदोलन केले. टाळाचा आवाज आणि घोषणांमुळे विधानभवन परिसर दुमदुमला होता. विधिमंडळाच्या कामकाज सुरु होण्यापूर्वी आमदार रोहित पवार यांनीही आंदोलन केले. शासन स्तरावर कर्जत जामखेड प्रस्तावित प्रश्नावर रोहित पवार यांनी विधानभवनातील शिवरायांच्या पुतळ्याजवळ बसून आंदोलन केले.