Maharashtra Kesari 2023 : एक रुपयानं पोतं उचललं, हमाली केली अन् सिकंदरला महाराष्ट्र केसरी केलं - Maharashtra saffron 2023

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 11, 2023, 7:42 PM IST

सोलापूर Maharashtra Kesari 2023 : महाराष्ट्र केसरी स्पर्धा शुक्रवारी सायंकाळी पार पडली. (Maharashtra Kesari Competition 2023) गतवर्षीच्या महाराष्ट्र केसरी विजेता शिवराज राक्षे सोबत झालेल्या कुस्तीत सोलापूरच्या सिकंदरनं अवघ्या 22 ते 23 सेकंदात शिवराज राक्षेला पराभूत करत 66वी महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. (Maharashtra Kesari Sikandar Sheikh) महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख हा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्याचा आहे. (Sikandar Sheikh) ही स्पर्धा विजयी होताच मोहोळमध्ये आतिषबाजी करण्यात आली. सिकंदरचे वडील रशीद शेख म्हणाले की, अतिशय गरीब परिस्थितीतून सिकंदरला कुस्तीचे धडे दिले. मोहोळ मधील मार्केट यार्डात हमाली करत एक रुपया प्रति पोतं उचलून सिकंदरला पैलवान केलं. हलाखीच्या परिस्थितीत सिकंदरनं महाराष्ट्र केसरीची गदा जिंकून सोलापूरचं नाव कुस्तीच्या इतिहासात कोरलं. हे सांगताना त्यांच कंठ दाटून आला होता.

पंचाचा चुकीचा निर्णय? गतवर्षी देखील सिकंदरच महाराष्ट्र केसरी होता; मात्र पंचाच्या चुकीमुळं गदा हुकली. काही महिन्यांपूर्वी पुणे येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली होती. सेमी फायनलमध्ये महेंद्र गायकवाड यासोबत लढताना पंचानं चुकीचा निर्णय दिला होता. त्यामुळे सिकंदरला सेमी फायनलवर समाधान मानावं लागलं होतं. यंदा मात्र झोळी डाव टाकून सिकंदरनं काही सेकंदातच प्रतिस्पर्धीवर विजय मिळवत महाराष्ट्र केसरीची गदा आपल्या नावे केली.

मोहोळमध्ये आतिषबाजी : सिकंदर शेख हा अंतिम सामना जिंकताच मोहोळमधील मुख्य चौकात मोठी आतिषबाजी करण्यात आली. सिकंदरचे वडील रशीद शेख यांना पेढे खाऊ घालून ग्रामस्थांनी आनंद साजरा केला. मोहोळ तालुक्यातील एका हमालाच्या मुलानं राज्यभर नाव केलं याचा मला मोठा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.