Minister Dr Tanaji Sawant : मी मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाही, मी सांगेल ती कामं करायची - मंत्री तानाजी सावंतांची दमदाटी - मंत्री डॉ तानाजी सावंत
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 10, 2023, 9:27 PM IST
धाराशिव Minister Dr Tanaji Sawant : कायम वादग्रस्त वक्तव्य करणारे (Tanaji Sawant Controversial Statement) राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी धाराशिव येथे पोलीस अधीक्षकांना दमबाजी करत आज पुन्हा मी मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाही. (Minister Sawant On Police Superintendent) तेव्हा तुम्ही मी सांगेल ती कामं करायची, अशा शब्दात पोलीस अधीक्षकांना सुनावलं. (Dharashiv Superintendent of Police)
सरकारला अडचणीत आणण्याचं काम : नुकतंच पुणे येथे डॉ. सावंत यांनी मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं ''मी पंचाग घेऊन बसलो नाही'', असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याची राळ खाली बसत नाही तोवर हा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे ते कायम अशी वादग्रस्त वक्तव्यं करून सरकारला अडचणीत आणण्याचं काम करत असल्याचं सर्वत्र बोललं जात आहे. यापूर्वी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. तानाजी सावंत यांनी कुठलंही वादग्रस्त वक्तव्य करू नये, प्रसार माध्यमांपासून दूर राहावं, असा सल्ला दिला होता. तरीही सावंत हे नेहमी वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. (Tanaji Sawant Viral Video)
पोलीस अधीक्षकांना उघड धमकी : धारशिवच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या रिक्त झालेल्या पोलीस निरीक्षकपदी वासुदेव मोरे यांची नियुक्ती करा, त्यांची ऑर्डर आजच्या आज काढा, मी सांगेल ते करायचं. मी मुख्यमंत्र्याचं देखील ऐकत नाही, अशी दमबाजी पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना सार्वजनिक ठिकाणी केली आहे. त्याचाच हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.