धारावीचा अदानींकडून पुनर्विकास करण्याला विरोध, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन - विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 13, 2023, 1:14 PM IST
नागपूर : Maharashtra assembly winter session 2023 विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या सलग पाचव्या दिवशी सुद्धा विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलय. धारावी झोपडपट्टी पुनर्विकासाचे काम अदानी यांच्या कंपनीला देण्यात आल्याच्या विरोधात विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे आणि वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आहे. धारावी पुनर्विकासाबाबत विरोधकांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. धारावी वाचवा आणि लघू उद्योग वाचवा असे फलक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी हातात घेत जोरदार घोषणाबाजी केली. मोदानी हटावओ, धारावी बचाओ आणि अदानीला सूट, धारावीची लूट आणि आज धारावी, उद्या मुंबई असे बॅनर घेत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी यावेळी केली. धारावी विकासाच्या नावाखाली गुंडगिरी सुरू असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी केला.