Mangoes To Dagdusheth Ganapati: अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य; रुग्णालयात होणार प्रसादाचे वाटप - Mahanaivedya of 11 Thousand Mangoes
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. पुणे येथील गणपती बाप्पांच्या सभोवती आंब्यांची आकर्षक आरास करण्यात आली. आज सकाळपासूनच अक्षयतृतीयेच्या निमित्ताने भाविक मंदिरात दर्शनासाठी येत आहेत. तर प्रवेशद्वार ते गाभाऱ्यापर्यंत रंगीबेरंगी फुलांनी सजावट केली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित केला आहे. यामध्ये गणपतीला अकरा हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला. आंब्यांचे सुप्रसिद्ध व्यापारी श्री देसाई बंधु आंबेवालेचे मंदार देसाई यांच्या परिवाराच्या वतीने हा नैवेद्य देण्यात आला. गणरायाचे दर्शन घेण्यासाठी तसेच आब्यांची आरास पाहण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली आहे. तसेच यापूर्वी पहाटे चार ते सकाळी सहापर्यंत गायक अविनाश चंद्रचूड, विश्वजित जोशी, सावनी रवींद्र यांनी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केली. त्यानंतर सकाळी ८ वाजता विशेष गणेशयाग व रात्री नऊ वाजता भजन, विठ्ठल प्रासादिक महिला भजनी मंडळाच्यावतीने भजन करण्यात आले.