LGBTQ community : न्यायालयाच्या निकालाने आम्ही निराश असलो तरी कायदेशीर लढाईसाठी तयार - एलजीबीटीक्यू समुदाय

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

नागपूर LGBTQ community : समलैंगिक विवाहाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज (17 ऑक्टोबर) अतिशय महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. यात सर्वोच्च न्यायालयानं समलैंगिक विवाहाला मान्यता देण्याचा अधिकार आम्हाला नाही म्हणत संसदेत कायदा करावा लागेल असं सांगितलं आहे. विशेष विवाह कायद्यात बदल करणं आवश्यक आहे की नाही ते देखील संसदेनं ठरवायचं असल्याचं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं आज नोंदवलेल्या निरीक्षणावर एलजीबीटीक्यू समुदाय निराश झालेला आहे. समलैंगिक विवाहाच्या संदर्भात आज आपल्याच बाजूनं निकाल लागेल अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र, न्यायालयानं संसदेकडं हे प्रकरण वर्ग केल्यामुळं निराश झालो असलो तरी कायदेशीर लढाई लढण्याकरिता तयार असल्याचं मत एलजीबीटीक्यू समुदायाच्या सदस्यांनी व्यक्त केल आहे. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.