Leopard made cow its prey: ट्रकच्या हॉर्न-लाईटला न घाबरता बिबट्याने केली गायीची शिकार - Leopard made cow its prey
🎬 Watch Now: Feature Video
बागेश्वर: जिल्ह्यातील काफलीगिर तालुक्यात नुकतेच बिबट्याने एका वृद्ध महिलेवर हल्ला केला होता. त्यात महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही बिबट्याची दहशत (Bageshwar Leopard Attack) सुरूच आहे. बिबट्याने अनेक गुरांना आपली शिकार बनवले आहे. बिबट्याच्या हल्ल्याचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. काल रात्री एक ट्रक चालक बागेश्वरहून हळदवणीच्या दिशेने जात होता (Bageshwar Pauri Dhar) . दरम्यान, बागेश्वर पौरी धारजवळ ट्रकचालकाला बिबट्याने गायीवर हल्ला करताना पाहिले. ट्रकचालकाने हॉर्न वाजवून बिबट्याला पळवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला. प्रखर प्रकाश पाहून आणि हॉर्न वाजवूनही बिबट्याने आपली शिकार सोडली नाही. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गावकरीही दहशतीच्या छायेत जगत आहेत. या परिसरात बिबट्याचे सातत्याने हल्ले होत असून, वनविभागाकडून याबाबत ठोस कारवाई केली जात नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. बिबट्याला लवकर पकडण्याची मागणी त्यांनी केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST