Lasalgaon Railway Station: लासलगाव रेल्वे स्थानकाचे पालटणार रुपडे; पंतप्रधानांच्याहस्ते होणार उद्घाटन - Lasalgaon Railway Station

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 28, 2023, 4:12 PM IST

नाशिक : लासलगाव रेल्वे स्थानकाचा पंतप्रधान अमृत भारत स्थानक योजनेत समावेश केल्याने रुपडे बदलणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑगस्ट महिन्यातील पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात 15 ऑगस्टपूर्वी व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे या स्थानकाचे  उद्घाटन केले जाणार आहे. लासलगाव रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यासाठी आलेले भुसावळ विभागाचे प्रबंधक इती पांडेय यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील लासलगाव रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण व्हावे, येथे प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात तसेच  देशासह विदेशात कांदा पाठवताना रेल्वे स्थानकात सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा असाव्या हा मूळ हेतू आहे.यामुळे स्थानक परिसरातील वाहतूक सुधारणा, नवीन बुकिंग ऑफिस, स्थानक परिसराचे सुशोभीकरण, न्यू फुट ओव्हर ब्रीज लिफ्ट सह प्लॅटफॉर्म कोच इंडिकेटर, इलेक्ट्रॉनिक बोर्ड डिस्प्ले, स्थानक प्रवेशद्वारांचा विकास, स्थानकावर व्हीआयपी प्रतिक्षागृहांची उभारणी अंतर्गत रचनेत सुधारणा, स्वच्छतागृहांमध्ये सुधारणा, गार्डन, कांदा लोडींग काँक्रीटीकरण, पार्किंग व्यवस्था या कामांना सुरुवात केली जाणार आहे. यानिमित्ताने कोविड काळात बंद पडलेल्या एक्सप्रेस गाड्या सुरू कराव्या तसेच गोदावरी एक्सप्रेस धुळेऐवजी मनमाड येथून सोडावी, अशा मागण्यांचे निवेदन प्रवासी संघटनेच्या वतीने देण्यात आले. कांदा लोडींगसाठी मालगाड्या उपलब्ध करण्यात याव्या, पुन्हा किसान रेल सुरू करावी अशी मागणी यावेळी लासलगाव बाजार समितीच्या माजी सभापती सुवर्णा जगताप यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.