'अधिवेशनात मला बोलूच दिलं नाही, विरोधकांची मुस्कटदाबी होते', रवींद्र धंगेकरांचा आरोप
🎬 Watch Now: Feature Video
पुणे Ravindra Dhangekar News : सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात दररोज विविध घडामोडी घडत आहे. विरोधकांच्या वतीनं सभागृहाबाहेर आंदोलन केलं जातंय. तसंच दोन दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात ललित पाटील प्रकरणात सविस्तर माहिती दिली. मात्र, त्यांच्या माहितीनंतर विरोधकांकडून टीका केली जात आहे. आता यावर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं आहे. मला या प्रकरणात अधिवेशनात बोलूच दिलं नसल्याचं यावेळी धंगेकर म्हणालेत. तसंच मी सातत्यानं ललित पाटील संदर्भात भूमिका मांडत आहे. याबाबत अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीदेखील मी आंदोलन केलं. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ललित पाटील प्रकरणात डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई करण्यात आलीय. पण तसं नसून या प्रकरणी डॉ. संजीव ठाकूर यांना अटक करण्यात यावी. दरम्यान, अधिवेशनात राज्याच्या हिताची कोणतीच चर्चा होत नाहीयं. फक्त सत्ताधारी यांची वाह-वाह केली जात आहे. विरोधकांना अधिवेशनात बोलू दिलं जात नाही, त्यांची मुस्कटदाबी केली जात आहे. जे लोक सरकारची वाह-वाह करताय फक्त त्यांनाच बोलू दिलं जातंय, असंही ते म्हणाले.