Lalbaugcha Raja : नशाबंदी मंडळानं लालबागच्या राजाला घातलं 'हे' साकडं; पाहा व्हिडिओ - नशा मुक्त
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 22, 2023, 10:19 AM IST
मुंबई : Lalbaugcha Raja : गणेशोत्सवामुळं लालबाग परिसर गणेश भक्तांनी दुमदुमला असून याचं औचित्य साधत महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळाने निर्व्यसनी महाराष्ट्र निर्मितीच्या संकल्पात सामील होण्यासाठी जनप्रबोधन सुरू केलंय. लालबाग मधील प्रसिद्ध लालबागचा राजा मंडळाच्या शेजारी असलेल्या चिवडा गल्लीमध्ये महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळातर्फे गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नशामुक्त (people addicted to intoxication ) होण्यासाठी पत्रक देऊन त्यांचं प्रबोधन करण्याचं काम नशाबंदी मंडळातर्फे केलं जातंय. लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर नशाबंदी मंडळाने महाराष्ट्र राज्य नशा मुक्त करावा असं साकडं लालबागच्या राजाला घातलंय. व्यसन हा मानसिक आजार असून तो बरा होऊ शकतो असं जनप्रबोधन करून लेखी प्रतिज्ञा देत व्यसनी व्यक्तीला निर्व्यसनी करण्याचं जनप्रबोधन या मंडळाकडून केलं जातंय.